Judges 10

1अबीमलेखा नंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला माणूस तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीरात राहत होता. 2त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीरात पुरला गेला.

3नंतर त्याच्यामागे गिलादी याईर उभा झाला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला. 4त्याला तीस पुत्र होते; तीस गाढवावर ते बसत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत. 5मग याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे पुरले.

6यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबांतले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्टयांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वराला सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही. 7यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यास पलिष्टयांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.

8त्यावर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलिकडे अमो-यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले. 9यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढायास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले.

10तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वराला मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बालाची उपासना केली. 11तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हांस सोडवले नाही काय? 12आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हांस जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हांस त्यांच्या हातातून सोडवले.

13तरी तुम्ही मला सोडून दुस-या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही. 14जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यांला हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हास सोडवावे.

15तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराला म्हटले, आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हास कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हास सोडव. 16तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दु:दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.

17अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादांत तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला. तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकाला म्हणाले जो माणूस अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादांतल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.

18

Copyright information for MarULB